16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयभ्रष्टाचाराची घराणेशाही संपविण्याला प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

भ्रष्टाचाराची घराणेशाही संपविण्याला प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध झिरो टॉलरन्स संदर्भात व्हिजिलन्स आणि अँटी करप्शनच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी अशी व्यवस्थापन बनवण्याचा प्रयत्न केला ज्यात धोरणांमध्ये नैतिकता असेल. नंतरच्या दशकात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली, असे पंतप्रधानांनी यांवेळी सांगितले.

हजारो कोटींचे घोटाळे, बनावट कंपन्यांचे जाळे, कर चुकवेगिरी हे सर्व गैरप्रकार वर्षानुवर्षे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. २०१४ मध्ये देशाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात मोठे आव्हान हे वातावरण बदलण्याचे होते. गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्सने देश पुढे गेला आहे. २०१४ पासून आतापर्यंत प्रशासकीय, बँकिंग व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, शेती, कामगार या सर्व क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे मोदी म्हणाले.

भ्रष्टाचार म्हणजे फक्त काही रुपयांचा विषय नाही. भ्रष्टाचाराने देशाच्या विकासाला ठेच पोहोचते. त्याचवेळी भ्रष्टाचाराने सामाजिक समतोलही नष्ट होतो. देशाच्या व्यवस्थेवर जो विश्वास हवा आहे तो भ्रष्टाचारामुळे उडतो, असे मोदींनी सांगितले. भ्रष्टाचाराची घराणेशाही हे आजवरचे सर्वात मोठे आव्हान आहे. भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा होत नाही किंवा किरकोळ शिक्षेमुळे इतरांच्या मनातील भीतीही दूर होते. तेही भ्रष्टाचार करण्यास धजावत नाही. ही परिस्थितीही अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच भ्रष्टाचाराच्या घराणेशाहीवर हल्ला करावा लागेल, असे आवाहन मोदींनी केले.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या