24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeनांदेडनांदेडमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेडमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नांदेड: विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणा-या विद्याथीर्नीने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून होणा-या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. घटनास्थळी पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली असून, या चिठ्ठीत तिचा प्रियकर आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना बुधवारी (दि.२१) मध्यरात्री उघडकीस आली.

गीता कल्याण कदम ( वय २२ रा. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गीता ही विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. तृतीय वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. दि.२१ मध्यरात्री वसतिगृहातील खोली आतून बंद करून घेऊन गीताने खिडकीच्या पडद्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि अशोक घोरबांड व अन्य पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे या चिठ्ठीतील माहितीतून समोर येत आहे. यामध्य आत्महत्येला कोण जबाबदार आहे? याबाबत सविस्तर माहिती लिहून ठेवली आहे. त्यातील मजकुरामध्ये तिचाच वाशिमचा मित्र हा कशाप्रकारे जबाबदार आहे याचा उल्लेख असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

माझ्या सारखा मृत्यू इतर मुलींना मिळू नये, यासाठी मी आत्महत्या करत आहे तसेच महिला आयोगाने सुद्धा माझ्या मृत्यूची चौकशी करावी, असे त्या चिठ्ठीत नमूद असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी ग्रामीण पोालिस ठाण्यात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या