18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeक्रीडाइंग्लंड टी २० विश्वविजेता

इंग्लंड टी २० विश्वविजेता

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : टी २० विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना इंग्लंडने ५ विकेट्सनी जिंकत इतिहास रचला आहे. दुस-यांदा टी २० विश्वचषकावर इंग्लंडनं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेलेला हा पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड टी २० विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोंिरग मॅच असूनही चुरशीची असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेक ंिजकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या १३७ धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं.

पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे १३८ धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद ५२ धावा करत ५ गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक ंिजकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय बोलर्सनी अगदी योग्य असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या १३७ धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण १५ धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही ८ धावांवर बाद झाला. कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण ३२ धावा करुन तोही तंबूत परतला.

इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत २८ चेंडूत ३८ धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने १३७ धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने ४ ओव्हरमध्ये केवळ १२ धावा देत ३ महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनं एक महत्त्वाची विकेट घेतली.

१३८ धावांचं माफक लक्ष्य गाठतानाही इंग्लंडला फार अडचणी आल्या. त्यांची सुरुवातही खास झाली नाही. अ‍ॅलेक्से १ धाव करुन बाद झाला. मग फिलीपही १० रनांवर तर कर्णधार बटलर २६ रनांवर तंबूत परतला. मग स्कोक्स आणि ब्रुकने डाव सावरला पण ब्रुक २० रनांवर बाद झाला. स्टोक्सची झुंज कायम होती. त्याला मोईन अलीने साथ दिली, पण १९ रनांवर तोही बाद झाला. ज्यानंतर मात्र स्टोक्सने विजय पक्का करत नाबाद ५२ धावांच्या मदतीने संघाला सामना ंिजकवून दिला. अप्रतिम गोलंदाजी करणा-या सॅम करनला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून यावेळी गौरवण्यात आलं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या