27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात साथीच्या आजारांचे थैमान

राज्यात साथीच्या आजारांचे थैमान

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. हिवतापाच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ होत असून ऑगस्टच्या तिस-या आठवड्यात स्वाईन फ्लूचे २५, तर डेंग्यूचे २७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर हिवतापाचेही ९७ रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १६३ रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत कोरोनाबरोबरच इतर आजारांचेही प्रमाण वाढतच आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हिवताप, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. दुस-या आणि तिस-या आठवड्यातही तशीच परिस्थिती आहे. हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू या आजारांच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १६३ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ५०९ वर पोहोचली आहे.

मात्र आतापर्यंत एकही रुग्ण या आजारांमुळे मृत पावल्याची नोंद नाही. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १०५ झाली आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे
सर्वसामान्यत: स्वाईन फ्लू हा किरकोळ सर्दी-खोकल्याचा आजार आहे. तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे या आजारात आढळतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य रुग्णांमध्ये स्वत:हूनच बरा होतो.

काहीच व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो. गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसायला लागतात.

कोणत्या आजारांचे किती रुग्ण?
मुंबईत ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १६३ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ५०९ वर पोहोचली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले होते, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १०५ झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या