37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeराष्ट्रीयविषाची चारा खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज : तब्बल 15 गायींचा मृत्यू

विषाची चारा खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज : तब्बल 15 गायींचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

बांदा : उत्तर प्रदेशमध्ये 15 गायींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गायींचे शवविच्छेदन केले आहे. त्याचा अहवाल अजून आलेला नाही, तरी या गायींचा मृत्यू विषारी चारा खाल्ल्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात 15 गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी जे पी यादव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पशु चिकित्सा अधिकार्‍याला बोलावून घेतले. अधिकार्‍यांनी मृत गायींचे शवविच्छदन करून मृतदेहन दफन केले. गायींचा मृत्यू विषारी चारा खाल्ल्यामुळे झाला असावा असा अंदाज यादव यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.

बांदा जिल्ह्यात गायींच्या मृत्यूची ही पहिली घटना नाही. यापूर्वी 2019 मध्ये भूक आणि थंडीने 55 गायी वासरांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारी गोशाळेच्या दोन कर्मचार्‍यांना निलंबीतही करण्यात आले होते.

Read More  सीईटी : परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ८ जूनला संपणार

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या