27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeकोरोनानंतरही खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात भीती कायम असेल: राहुल द्रविड

कोरोनानंतरही खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात भीती कायम असेल: राहुल द्रविड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिग्गज भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या महामारीनंतर जेव्हा खेळ पुन्हा सुरु होतील, तेव्हा खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या मनात शंका, संकोच आणि भीतीची भावना कायम राहणार आहे. कोरोना व्हायरसमुळे टोकीयो आॅलिंम्पिकसह जगभरातील अनेक खेळांच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

राहुल द्रविड म्हणाला की, खेळ सुरु झाल्यानंतर काही वेळासाठी खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या मनात शंका आणि भीती असणार आहे. मला विश्वास आहे की, जेव्हा कोरोनानंतर पुन्हा खेळ सुरु होणार तेव्हा निश्चितपणे भीती वाटणारच. भारतीय संघाच्या स्टार फलंदाजांमध्ये सहभागी होणारा राहुल द्रविड पुढे बोलताना म्हणाला की, ही फार मोठी समस्या असेल, असे मला अजिबात वाटत नाही. यावेळी जेव्हा मोठे खेळाडू त्यांच्या आवडत्या गोष्टीसाठी मैदानात उतरणार तेव्हा त्यांना अशा समस्यांचा त्रास होईल, असे वाटत नाही.

Read More  आजारी वडिलांसह सायकलवरून १,२०० किमी प्रवास!

द्रविड फेसबुक लाइव्हवर स्टेइंग अहेड आॅफ कर्व – द पावर आॅफ ट्रस्ट विषयावर चर्चा करताना म्हणाला की, लॉकडाऊनमुळे अनेक खेळाडू दोन ते तीन महिन्यांपर्यंत खेळू शकणार नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनंतर त्यांना आत्मविश्वासाने खेळणे थोडे कठिण होणार आहे. कारण लॉकडाऊनमुळे त्यांना फिटनेस राखणे तेवढे शक्य झालेले नाही. त्यांच्यासाठी ही खरी समस्या असणार आहे.

द्रविडसोबत या चर्चासत्रात आॅलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा आणि बॅडमिंटनचे माजी दिग्गज खेळाडू प्रकाश पादुकोन देखील सहभागी झाले होते. द्रविडने सांगितले की, स्पर्धांमध्ये खेळण्याआधी खेळाडूंना आपल्या फिटनेससाठी काही वेळ दिला गेला पाहिजे. त्यामुळे खेळाडू पुन्हा आत्मविश्वासाने मैदानावर उत्तम कामगिरी करू शकतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या