27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून उठू लागले

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून उठू लागले

एकमत ऑनलाईन

गुलाबराव पाटील, महाजन यांची उडाली तारांबळ
मुक्ताईनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगावच्या दौ-यावर होते. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून उठून जायला लागले. लोक निघून जात असल्याचे पाहून गुलाबराव पाटील यांनी त्यांचे भाषण आवरते घेतले. भाजप नेते गिरीश महाजनही मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. गिरीश महाजन यांनाही कार्यकर्ते निघून जात असल्यामुळे भाषण आवरते घ्यावे लागले. गिरीश महाजन यांनी तर जात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबण्याची विनंती केली.

वेळ फार कमी आहे. आमच्या माता-भगिनींना घरी जायचे आहे. ते चलबिचल दिसत आहेत. त्यामुळे गुलाबरावांनी भाषण आटोपते घेतले, मी पण आटोपते घेतो, असे गिरीश महाजन म्हणाले. प्रमुख नेत्यांनी भाषण आटोपते घेतल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरूवात केली. इथे आणलेली माणसे भाड्याने आणलेली नाहीत. अपक्ष आमदार असतानाही इतका जनसमुदाय आला आहे, असे एकनाथ शिंदे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले.

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला. चंद्रकांत मला अनेकदा भेटायचा आणि रडायचा, मी ऐकून घ्यायचो, कारण ऐकणारा मी एकटाच होतो. आता तुला घाबरायची गरज नाही. हा खरा एकनाथ तुझ्यामागे खंबीरपणे उभा आहे. एका आमदाराला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. आधीचे एकनाथ हात धरून मागे लागले होते. मात्र हा एकनाथ हात धरून चालेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या