27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रीपद गेले तरी शासकीय बंगल्यांचा मोह सुटेना; शिंदे गटानेही सोडला नाही ताबा

मंत्रीपद गेले तरी शासकीय बंगल्यांचा मोह सुटेना; शिंदे गटानेही सोडला नाही ताबा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिन्याभरपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार खोळंबला आहे. मात्र काही नेत्यांनी अद्याप सरकारी बंगला सोडलेला नाही. उदय सामंत, संदीपान भुमरे आणि दादा भुसे या शिंदे गटातील नेत्यांच्या बंगल्यावर तर बैठका, पत्रकार परिषदा सुरू आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणा-या एकून ४० बंगल्यांपैकी फक्त १८ बंगले रिकामे झाले आहेत. १३ माजी मंत्री आणि एका माजी अधिका-याने अद्याप बंगले सोडलेले नाहीत. राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांसाठी मंत्रालय परिसरात मलबार हिल आणि आमदार निवासातल्या बंगल्यांमध्ये राहायची व्यवस्था केली जाते. त्यामुळे आपल्या आवडीच्या बंगल्यांसाठी मंत्र्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

रिक्त न झालेल्या बंगल्यांमध्ये शिंदे गटातले उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे या माजी मंर्त्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनीही अद्याप बंगले सोडलेले नाहीत. आव्हाडांनी ठाकरे सरकार पडल्यानंतर शासकीय निवासस्थानी सगळ्या कामगारांचे आभार मानत निरोप समारंभही आयोजित केला होता.मात्र अधिकृतरित्या त्यांनी अजूनही आपला बंगला सोडलेला नाही.

 • बंगला सोडलेले मंत्री
  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,यशोमती ठाकूर,
  सुनील केदार, बाळासाहेब थोरात,,राजेंद्र शिंगणे,राजेश टोपे, अनिल देशमुख,नवाब मलिक,सुभाष देसाई,
  नितीन राऊत, अस्लम शेख, दिलीप वळसे पाटील,
  के.सी. पडवी, अमित देशमुख, वर्षा गायकवाड,
  अनिल परब, संजय राठोड
 • बंगला न सोडलेले मंत्री
  धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, दादाजी भुसे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, श्यामराव पाटील, नाना पटोले, सीताराम कुंटे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या