29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडाकसोटी मालिकेतही विजयाची गुढी?

कसोटी मालिकेतही विजयाची गुढी?

एकमत ऑनलाईन

केप टाऊन : भारताने चौथ्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर डीन एल्गरची विकेट मिळवली आणि विजयाचा शंख फुंकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता संक्रातीच्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेचा पतंग ते गुल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तिस-या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली नसली तरी रिषभ पंतने झुंजार शतक झळकावले. त्यामुळे भारताला दुस-या डावात १९८ धावा करता आल्या. भारताने आता दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले आहे. तिस-या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची २ बाद १०१ अशी स्थिती असून ते विजयापासून १११ धावा दूर आहेत. दुसरीकडे भारताला विजय मिळवण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भारताच्या विजयाच्या मार्गातील एल्गर हा मोठा अडसर दूर झाला.

तत्पूर्वी, तिस-या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज फार धावा करू शकले नाहीत. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. त्यानंतर मैदानावर आलेल्या ऋषभ पंतने कर्णधार विराट कोहलीसह पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी केली. या दोघांनी भारताचा डाव सावरला आणि आघाडी १५० च्या पुढे नेली. लंच ब्रेकपर्यंत पंतने अर्धशतक पूर्ण केले होते. विराट-पंत जोडी संघाला २०० च्या पुढे घेऊन जाईल, असे वाटत असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. कर्णधार विराट कोहली २९ धावांवर बाद झाला. त्याने १४३ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावा केल्या. त्यानंतर पंतला तळातील फलंदाजांची साथ मिळाली नाही. तरीदेखील पंतने शतक पूर्ण केले.

पंतने १३९ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. पंतच्या या खेळीमध्ये ४ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमधील पंतचे हे चौथे शतक आहे, तर द.आफ्रिकेच्या दौ-यावर प्रथमच गेलेल्या पंतचे हे पहिले शतक ठरले. या मालिकेत पंत फार चांगली फलंदाजी करू शकला नव्हता. पण मालिकेतील अखेरच्या सामन्यातील अखेरच्या डावात त्याने कमाल केली. जेव्हा संघातील सर्व फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते, तेव्हा पंतने जोरदार फलंदाजी केली. द.आफ्रिकेत शतक करणारा पंत हा पहिला आशियाई विकेटकिपर आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या