21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलॅम्बडा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही जास्त धोकादायक

लॅम्बडा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही जास्त धोकादायक

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. तर, भारतात आणखी एक कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे जगात कोरोनाबद्दल दिवसेंदिवस चिंतेचे वातावरण पसरत असताना, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या महाभयंकर समजल्या जाणा-या लॅम्बडा व्हेरिएंटचा शोध लागला आहे.

डेल्टा प्लसपेक्षाही हा लॅम्बडा हा व्हेरिएंट जास्त धोकादायक असल्याची शक्यता आहे. लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार जगातील ३० देशांमध्ये झाला आहे. असं असलं तरी, हा व्हेरिएंट भारतात सापडलेला नाही. लॅम्बडा या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा उगम आफ्रिकेतल्या पेरू देशात झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे. लॅम्बडा या व्हेरिएटंला सी ३७ असे नाव देण्यात आले आहे. कोरोनामुळे सध्या सर्वाधिक मृत्यू पेरू देशात झालेले दिसून आलेले आहे. येथे मे आणि जून महिन्यात एकूण ८४ टक्के रुग्णांमध्ये हे लॅम्बडा व्हेरिएंट सापडला आहे. तसेच चिली देशात जास्त लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे.

मलेशिया आरोग्य मंत्रालयाकडून सतर्कता
मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार वेगात होऊ शकतो. डेल्टाच्या तुलनेत हा व्हेरिएंट जास्तच धोकादायक आहे. लसीकरणानंतर नागरिकांच्या शरीरात निर्माण झालेल्या अ‍ॅन्टिबॉडी नष्ट करण्याच काम लॅम्बडा व्हेरिएंट करतोय, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.१८ टक्क्यांवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या