19.1 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र निसर्गाने तर अन्याय केलाच आता राज्‍य सरकारही सूड घेतेय ! - देवेंद्र...

निसर्गाने तर अन्याय केलाच आता राज्‍य सरकारही सूड घेतेय ! – देवेंद्र फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज अतिशय फसवे आहे. त्‍यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्‍द फिरविला आहे. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

गेल्यावर्षी स्वतः उद्धव ठाकरे यांनी २५ हजार आणि ५० हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय्.पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली, फसवणूक केली, असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देणारा निर्णय – धिरज विलासराव देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या