37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeनांदेडविकास कामात गडकरींसारखी सर्वांची सहकार्याची भूमिका असावी : शरद पवार

विकास कामात गडकरींसारखी सर्वांची सहकार्याची भूमिका असावी : शरद पवार

एकमत ऑनलाईन

नांदेड : राजकीयदृष्ट्या आमची आणि केंद्र सरकारमधील नेत्यांची भूमिका वेगळी आहे. मात्र जिथे विकासकामांचा प्रश्न येतो तिथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी भूमिका नेहमी सहकार्याची व सामंजस्याची भूमिका घेत असतात. हाच दृष्टिकोन जर देशाच्या पातळीवर केंद्र सरकारमधील नेतृत्वाने आणि इतर सर्वांनी ठेवला तर देशाचा चेहरा बदलण्याची जी सर्वांची अपेक्षा आहे, ती आपण पूर्ण करू असा आशावाद राष्ट्रवादी पक्षोच अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला. तर गोदावरी अर्बनने केवळ दहा वर्षात सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ काम केले या शब्दात गौरव केला.

शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या सहकारसूर्य मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी खा. पवार यांच्या हस्ते थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. या सोहळयात अभासी पद्धतीने सहभागी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती करीत खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्याचसह केंद्र सरकारला शाब्दिक चिमटे काढले.

यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आरबीआय बँकेचे संचालक सतिष मराठे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार अनसूया खेडकर, माजी आमदार पाशा पटेल यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दहा वर्षाच्या काळात गोदावरी अर्बनने एक नावलौकीक केला. नांदेड हे गोदावरी आणि गुरु गोविंदसिंग यांची पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जात होती. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात एमजीएमने नांदेडचे नावलौकिक कमावले आणि आता गोदावरी अर्बनने सहकार क्षेत्रात चमत्कार करून नावलौलिक मिळविला आहे. यामुळे नांदेडची ओळख अनेक राज्यात झाली. शेतीमध्ये मिळणा-या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग या भागात येणे जरुरी आहे. देशातील ६० टक्के जमिनी या कोरडवाहू जमिनी आहेत.

निसर्गाच्या लहरीवर शेती असल्यामुळे शेतक-यांनी शेतीवर भार न टाकता उद्योगाकडे वळावे. यासाठी आर्थिक भाग भांडवल देण्यासाठी गोदावरी अर्बन सारख्या संस्था उभ्या आहेत. परंतु घेतलेले कर्ज त्याचा योग्य वापर करून त्या कर्जाची व्याजासह परतफेड वेळेत करावे असे आवाहनही पवार यांनी केले. देशातील सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहकार क्षेत्र अतिशय महत्त्वाचे काम करत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम सहकार क्षेत्र ख-या अर्थाने बँकांचा व अन्य संस्थांच्या माध्यमातून करत आहेत यामुळे महाराष्ट्र सहकाराचा पाया मजबुत झाला आहे, असे ते म्हणाले.

समाजातील हजारो सामान्य लोकांना त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी गोदावरी अर्बन पण संस्था एक चांगले काम करत आहे. दहा वर्षांमध्ये या संस्थेने नावलौकिक करत सर्वसामान्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे धाडस करून दाखवले आहे. या सोबतच शेतीला जोड उद्योग म्हणून तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजÞे यासाठी पतपुरवठा करावा असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

अभासी पद्धतीने सहभाग घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घ्द्घटन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. राज्यात विविध क्षेत्रात शेती संदर्भात उद्योग निर्माण झाले पाहिजेत. आता सध्या दळणवळणाच्या माध्यमातून रस्ते जोडणी सुरू आहे. नांदेड -नागपूर महार्माग झाला आहे. आता इंदौर-हेैदराबाद एक्स्प्रेसची आखणी आहे. येणा-या काळात नांदेड सारख्या शहरात ड्रायपोर्ट सुरू करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर खा. हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी गुडविल, लोकांचा विश्वास जिंकला आहे. नेतृत्व गुण आहेत. यामुळे कमी काळात गोदावरी अर्बनने हे यश मिळविले असा उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री पाटील यांनी केले. यावेळी सतीश मराठे, काकासाहेब भोईटे यांनीही मार्गदर्शन केले. बँकेचे सरव्यवस्थापक धनंजय तांबेकर यांनी आभार व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या