24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसर्वाना लागली  चिंता : सोलापुरात नवीन ५५ करोनाबाधितरुग्ण आढळले

सर्वाना लागली  चिंता : सोलापुरात नवीन ५५ करोनाबाधितरुग्ण आढळले

एकमत ऑनलाईन

एकूण रूग्णसंख्या ११३५ वर पोहोचली : सर्वाना लागली  चिंता, ४६९ रूग्ण करोनामुक्त

सोलापुर: सोलापुरात करोनाचा कहर दिवसागणिक वाढत चालला आहे. सोलापुरात ५२ दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजाराचा टप्पा पूर्ण करीत ११३५ पर्यंत गेली असताना मृतांचा आकडाही शंभरी गाठण्याच्या बेतात आहे. मागील आठवडाभरात रुग्णांची व मृतांची संख्या अधिकच झपाटय़ाने वाढत असून हा वेग कमी न होता आणखी किती वाढेल, याची सर्वाना चिंता लागली आहे. करोनाचा आता शहरातील पूर्व आणि दक्षिण भागानंतर उत्तर आणि पश्चिमेसह संपूर्ण गावठाण भागात तसेच ग्रामीण भागात फैलावत आहे.

सोलापुरात बुधवारी दिवसभरात ४० नवे करोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर पुन्हा रात्रीत नवे ५५ नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे आता एकूण रूग्णसंख्या ११३५ वर पोहोचली आहे. यात ९४ मृतांचा समावेश आहे.

Read More  धक्कादायक : लातूर जिल्हा तीन दिवस निरंक, आज सहा रुग्ण आढळले

दरम्यान, आतापर्यंत रूग्णालयात उपचार घेऊन ४६९ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज गुरूवारी सकाळी करोनाशी संबंधित २६१ चाचणी अवास्तव प्राप्त झाले असता त्यात नवे ५५ रूग्ण बाधित निघाले. यात ३८ पुरूष व १७ महिला आहेत. जिल्हा ग्रामीण भागात बार्शी तालुक्यात नव्याने तीन बाधित रूग्ण सापडले असून त्यामुळे बार्शीतील रूग्णसंख्या १५ वर पोहोचली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या