25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रसगळे वॉशिंग मशिनमध्ये गेलेत, आता काय बोलणार?

सगळे वॉशिंग मशिनमध्ये गेलेत, आता काय बोलणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यात जे विद्यार्थी सहभागी होते, त्यांची एक यादी परीक्षा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीत अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार आणि उजमा अब्दुल सत्तार यांची नावं या यादीत आहेत. त्यावरून आता आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत.

अशात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘काही नाही सांगणार सगळे वॉशिंग मशिनमध्ये गेलेत. काय सांगायचं, काय बोलायचं.. संपूर्ण जनतेची फसवणूक झाली आहे. ईडी काडी लावून नेत्यांना आत घेतले गेले. या सगळ्यांना आता काय बोलायचं. सगळी तोडमोड सुरू आहे, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या