‘ऑस्कर २०२३’मध्ये पटकावले ७ पुरस्कार
मुंबई : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळा धामधुमीत पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या वर्षी कोणत्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. अखेर ‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स’ या सिनेमाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे.
‘ऑस्कर २०२३ ’मध्ये ‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स’ या सिनेमाला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नामांकने मिळाली होती. अखेर नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने ७ पुरस्कार पटकावले आहेत.
‘ऑस्कर २०२३’ मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरलेला हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. नील क्वान आणि डैनियल शेइनर्टने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स’ ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाल्यानंतर सिनेमाच्या टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा सिनेमा एका चिनी महिलेच्या आयुष्यावर आधारित आहे. अनपेक्षित साहसाचा सामना केल्यानंतर महिलेला एका दुस-याच विश्वात जावं लागतं. त्या महिलेल्या अवती-भोवती फिरणारं सिनेमाचं कथानक आहे.
‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स’ ला मिळालेले ११ नामांकन
या सिनेमाला सर्वाधिक ११ नामांकने मिळाली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन अशा अनेक श्रेणींमध्ये या सिनेमाने नामांकन मिळालं होतं.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: जेमी ली कर्टिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: के हुई क्वान
सर्वोत्कृष्ट लेखन (ओरिजनल स्क्रीनप्ले)
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री: मीशा येओह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
सर्वोत्कृष्ट पिक्चर
सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन (एडिटिंग)
सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत समावेश असलेले चित्रपट
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, ‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स’ , द फॅबलमॅन्स, टार, वीमेन टॉकिंग, ट्रँगल ऑफ सॅडनेस