23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयएमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगप्रकरणी पुरावे सादर

एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगप्रकरणी पुरावे सादर

एकमत ऑनलाईन

  पोलिसांकडून ८ जणांवर कारवाई
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथील महात्मा गांधी मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंगची प्रकरणे आता जोर धरत आहेत. याप्रकरणी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅगिंगचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील काही सीनिअर विद्यार्थी अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. यातील एक विद्यार्थी एका मुलीवर अश्लील कमेंट करत होता, अशी एका पीडित विद्यार्थ्याची तक्रार समोर आल्यानंतर व्यवस्थापनाने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांनी ही तक्रार केवळ महाविद्यालय प्रशासनाकडे न करता दिल्लीतील अँटी रॅगिंग समितीकडेही केली होती. या समितीकडून महाविद्यालय व्यवस्थापनाला ईमेलद्वारे माहिती मिळाली असून रविवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक झाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, सध्या याप्रकरणी रॅगिंग करण्याची मागणी करणा-या ८ विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. मागील ३ महिन्यांपासून प्रथम वर्षात शिकणा-या एका विद्यार्थ्याचे रॅगिंग सुरू असल्याचा आरोप आहे. रॅगिंगविरोधात एका विद्यार्थ्याने सर्व तांत्रिक पुरावे गोळा करून दिल्ली यूजीसी आणि अँटी रॅगिंग समितीकडे पाठवले. यात ऑडिओ, चॅटिंग आणि लोकेशनसह इतर पुराव्यांचा समावेश आहे. त्यामुळे समितीने प्रशासनाला यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महाविद्यालयातील सीनियर्स मोठ्या आवाजात अश्लील बोलतात. एखाद्या विद्यार्थ्याने नावाचा चुकीचा उच्चार केला तर त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना चापट मारली जाते. वर्गातील विद्यार्थिनींच्या नावाने गलिच्छ कमेंट करणे, विद्यार्थ्यांना जबरदस्तीने त्यांच्या घराचा पत्ता विचारणे, वर्गात मुंडण करून येण्यास सांगणे, असे काही आरोप या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहेत.

रॅगिंगसाठी हे सीनिअर विद्यार्थी फ्लॅटवर बोलावत होते, असेही एका विद्यार्थ्याने सांगितले आहे. तेथे त्यांना अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते. कोणतेही रेकॉर्ड होऊन पुरावे मिळू नयेत यासाठी त्यांचे मोबाईल काढून घेतले जात होते. हा मानसिक छळ असल्याची जाणीव अनेकांना झाली असल्याने त्यांनी पुरावे गोळा करत तक्रार केली. सध्या या रॅगिंग प्रकरणातील पुरावे पोलिसांना देण्यात आले असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र नियमानुसार विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या