26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना बळकावण्याचा शिंदे गटाचा दुष्ट प्रयत्न : सुभाष देसाई

शिवसेना बळकावण्याचा शिंदे गटाचा दुष्ट प्रयत्न : सुभाष देसाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना बळकावण्याचा एक दुष्ट प्रयत्न राज्यामध्ये केला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशीर पद्धतीने स्थापन झाले आहे, त्याला स्थगिती मिळाली पाहिजे असेही देसाई म्हणाले. यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केल्या आहेत.

यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत बारकाईने लक्ष घातले आहे. घटनात्मक अनेक मुद्दे असल्यामुळे याला वेळ लागत असल्याचे देसाईंनी सांगितले.

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास
सर्वोच्च न्यायालयामध्ये खूप बारकाईने हा मुद्दा ऐकला जात आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे मत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केले. हे प्रकरण विस्तारित पीठाकडे गेले किंवा नाही गेले तरी न्याय आम्हाला नक्की मिळणार असल्याचे देसाई म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या