22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रआरोग्य विभागातील परीक्षा ऑक्टोबरमध्ये

आरोग्य विभागातील परीक्षा ऑक्टोबरमध्ये

एकमत ऑनलाईन

१५ व १६ ला होणार क वर्गाच्या परीक्षा
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील भरतीला अखेर सुरुवात झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणा-या आरोग्य विभागातील गट क च्या भरतीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. १५ आणि १६ ऑक्टोबरला गट क या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार असून पुढच्या १५ दिवसांत त्यासंबंधी निकाल लावणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १५ आणि १६ ऑक्टोबरला या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार असून १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांची यादीसुद्धा जारी केली जाईल. यासंबंधी नियुक्त्यांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. रखडलेली मार्च २०१९ च्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मार्च २०१९ च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरतीबाबत आज शासन निर्णय जारी करण्यात आला. गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाणार असून, या भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या
परीक्षेत झाला घोळ
दरम्यान गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत घोळ झाल्याचे समोर आले. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या