22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडकोरोना निर्बंधांनंतरची रमजान ईद शहरासह तालुक्यात उत्साहात

कोरोना निर्बंधांनंतरची रमजान ईद शहरासह तालुक्यात उत्साहात

एकमत ऑनलाईन

कंधार : मुस्लिम धर्मीयांचे रमजान महिन्याचे ३० रोजे २ मे रोजी संपले. सोबतच सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने कोरोना निर्बंधांनंतरची रमजान ईद यावर्षी ३ मे रोजी ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षात जगाने कोरनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. या तीन लाटा कधीही न विसण्यासारख्या आहेत. यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांनी आपले उद्योगधंदे देशोधडीला लागताना पाहिले आहेत इदगाह मैदानावर नवीन कपडे परिधान करून नमाज पठण करण्यात आले नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवानी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी शिरखुरमा पार्ट्या रंगल्या होत्या.

आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुरम्याचा आनंद लुटला. या रमजानच्या शेवटी मुस्लिम समाजामध्ये धर्मादाय कामे केली जातात, जसे की गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे. ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो उपवासाच्या ३० दिवसांच्या समाप्तीची आठवण करून देतो. याचा दिवस चंद्राच्या दर्शनावरून ठरत असल्याने, जगभरात पाळल्या जाणा-या अचूक तारखेमध्ये थोडाफार फरक असू शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या