कळंब : कळंब शहरात मुंबई कुर्ला येथुन आलेल्या आठ जणांना शुक्रवारी कोरोंटाईन करुन स्वॅब घेतले असता पाच जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून ३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कळंब शहरात मोठी खळबळ माजली आहे.
तालुक्यात शिराढोण येथील एक रूग्ण पॉझिटिव्ह नीघाला असुन कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या तालुक्यात एकुण चौदा झाली आहे.आज शहरातील एका तरुणाने कोरोना वर मात केल्याची सुखद बातमी आली असतानाच , मुंबई कुर्ला येथुन कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव मधील रहिवाशी असणारे आठ जण प्रायव्हेट ट्रॅक्सीने आले असता त्यांना आयटीआयमध्ये कोरोंटाईन करून त्यांचे स्वॅब घेउन लातुर येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवण्यात आले होते यातील दोन महिला दोन पुरुष एक मुलगी या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असुन तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.
Read More भारताने सर्वात आधी ‘कोरोना’वर लस शोधावी -लेखिका तसलिमा नसरीन
तर शिराढोण येथील एका व्यक्तीचा स्वॅब येथील रुग्णालयात घेण्यात आला होता तो देखील पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याला मोठा हादरा बसला आहे शहरात आज एकदम पाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवाशीयांत मोठी खळबळ माजली आहे. शहरातील कंटेंटमेंट झोनमध्ये १० जुनपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.