24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री शिंदे

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री शिंदे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले, या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राज्याच्या विकासासाठी काही सदिच्छा भेट घेतल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले असून अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही भेट सदिच्छा भेट आहे. आम्ही दोघं उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देऊ असे त्यांनी सांगितलं. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का यावर बोलतांना शिंदे यांनी सांगितले की, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने ते मागे-पुढे होऊ शकते. पण या अधिवेशनाच्या पुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या