मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर ३० जून रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
मात्र, दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागले असताना १९ जुलैला शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील शपथविधी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. यासाठी शिंदे गट व भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्हीकडून चार ते पाच मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील व चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.