भरुच : गुजरातमधल्या भरूच जिल्ह्यातील एक केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला आहे. भरूचमधल्या दाहेज औद्योगिक क्षेत्रात एका फॅक्टरीत स्फोट झाल्यानंतर तिथं भीषण आग लागली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी आहे. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील दहेज येथे एका केमिकल कंपनीच्या बॉईलरमध्ये स्फोट झाल्याने कंपनीत कामाला असलेले ४० कामगार जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे परिसरात लांबच लांब धुराचे लोट काही काळ दिसत होते. सर्व जखमी कामगारांना भरुचमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती भरुचचे जिल्हाधिकारी एमडी मोडिया यांनी दिली.
Read More चक्रीवादळापूर्वीच शहरात पडली २० झाडे
स्फोट होऊन बराच वेळ झाला असला तरीही अजून आग पुर्णपणे विझलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या कंपनीतील केमिकल आरोग्यास घातक आहेत. त्यामुळे कंपनीच्या बाजुला असणाऱ्या लाखी आणि लुवारा या गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
Gujarat: Many workers injured in a blast at Yashashvi Rasayan Private Limited in Dahej Industrial Estate of Bharuch district. More details awaited. pic.twitter.com/Ldg2TLOUlr
— ANI (@ANI) June 3, 2020