23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeराष्ट्रीयटाटा स्टील फॅक्टरीत स्फोट, तिघे जखमी

टाटा स्टील फॅक्टरीत स्फोट, तिघे जखमी

एकमत ऑनलाईन

जमशेदपूर : जमशेदपूरमधील टाटा स्टील फॅक्टरीमध्ये शनिवारी (७ मे) गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात आतापर्यंत तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना टाटा मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट सकाळी १० वाजून २० मिनिटांनी झाला. टाटा कंपनीने यानंतर अधिकृत निवेदन जारी केले. जमशेदपूर येथे टाटा स्टील फॅक्टरीमधील कोक प्लँटमध्ये स्फोट होऊन आग लागली. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. सध्या घटना घडली तो कोक प्लँटमधील बॅटरी ६ हा भाग बंद करण्यात येत आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या