24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये गुप्तचर विभागाच्या इमारतीत स्फोट

पंजाबमध्ये गुप्तचर विभागाच्या इमारतीत स्फोट

एकमत ऑनलाईन

मोहाली : पंजाबमधील मोहालीतील गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये स्फोट झाला. इमारतीच्या दुस-या मजल्यावर रॉकेटसदृश वस्तू पडल्याची शक्यता व्यक्त होती. स्फोटामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. मोहाली पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

गुप्तचर विभागाच्या इमारतीत रात्री सव्वादहा वाजता स्फोट झाल्याची माहिती आहे. इंटेलिजन्स विभागातील इमारतीच्या दुस-या मजल्यावर रॉकेटसदृश वस्तू आदळल्याचे सांगितले जाते. ही रॉकेटसदृश वस्तू आदळल्यानंतर तिथे मोठा स्फोट झाला. या स्फोटात इमारतीचे नुकसान झाले.स्फोटाचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. पण अनेक अँगलने पोलिस स्फोटामागच्या कारणांचा शोध घेत आहेत. घटना घडल्याबरोबर मोहाली पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस घटनेची कसून चौकशी करत आहेत.

मोहाली शहर अगदी पंजाबची राजधानी चंदीगडला लागून आहे. त्यामुळे मोहालीमध्ये अशी घटना घडणे याला पोलिसांनी गंभीरपणे घेतले आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी अगदी वेगाने तपासाची सूत्रे हलवली आहेत. विशेष गोष्ट म्हणजे गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये असा स्फोट झाल्याने घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या