24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयरेमडेसिवीरवर निर्यातबंदी

रेमडेसिवीरवर निर्यातबंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधाची निर्यात थांबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. देशातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही, तोवर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधाची निर्यात बंद राहणार आहे, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. यासोबतच देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरच्या उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचे आदेशही केंद्राने दिले आहेत. यासोबतच देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिका-यांना रेमेडसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचनादेखील केंद्राने जारी केल्या आहेत.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठीदेखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता येत्या काळात रेमडेसिवीरची देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. रेमडेसिवीरच्या उत्पादनावरही बारकाईने लक्ष असल्याचेही केंद्र सरकारने आज स्पष्ट केले. देशभरात कोरोनाच्या दुस-या लाटेने सध्या थैमान घातले आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय रुग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरू आहे. अशा स्थितीत अनेक रुग्णांना आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकाने रेमडेसिवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वितरण व्यवस्थेची द्यावी लागणार माहिती
कोणत्या वितरकांच्या माध्यमातून त्या पुरवठा करत आहेत, याबाबत देखील माहिती द्यावी लागणार आहे. तसेच औषध निरीक्षक व इतर संबंधित अधिका-यांना रेमडेसिवीरच्या साठ्यावर सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे आणि काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत, हे देखील जाहीर करावे लागणार आहे.

राज्यात ६३,२९४ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या