22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी

मुख्यमंत्री शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी

एकमत ऑनलाईन

पक्षविरोधी कारवाईचा ठपका, शिवसेनेने केली कारवाई
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि कालच मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार झटका दिला. सकाळीच मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही, असे थेट सांगत एकनाथ शिंदेंना त्यांनी नाकारले होते. त्यानंतर सायंकाळी एक पत्र काढून ठाकरे यांनी शिवसेनेचे स्वेच्छेने सदस्यत्व सोडले, तसेच पक्षविरोधी कारवाई करून सेना फोडण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत त्यांची पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली.

याबाबत ठाकरेंच्या सहीचे पत्र पक्षाची शिस्तपालन समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीलाही पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रात १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आज पक्षनेतेपदावरून हटवले. ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. हे पत्र पक्षाची शिस्तपालन समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीलाही पाठवण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंविरोधात बोलणार नाही
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी जरी शिंदे यांना पक्षनेते पदावरून काढले, तरीही ते आता महाराष्ट्राचे नेते आहेत. यासह ते म्हणाले की, ठाकरे काहीही बोलले तरी ते आमचे नेते आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही एक शब्दही बोलणार नाही. त्यांनी भेटीला बोलावले तर आम्ही जाऊ. आमचे सेनापती एकनाथ शिंदे आहेत, आम्ही सर्व पत्ते तोडून टाकले. फक्त आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या