27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeमहाराष्ट्रसात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी

सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी

एकमत ऑनलाईन

पुणे : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणा-या मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांनी पक्षात राहून काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला, त्यामुळे ७ मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंकडून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणा-या रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, निलेश कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी जाहीर केले आहे. पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून हे लोक पक्षात कार्यरत नाहीत. पक्षाच्या कोणत्याही कामात किंवा कार्यक्रमात हे लोक सक्रिय नसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणा-या या सर्वांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे बाबर यांनी जाहीर केलेल्या पत्रात लिहिले आहे.

पुण्यातील पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र या निवडणुकीत प्रचार करणार नाही, असेही त्यांनी पाठिंबा देताना जाहीर केले होते. मात्र वैयक्तिक पातळीवर प्रचार करता येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या