22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रविजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

एकमत ऑनलाईन

मुंबई :  माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिवतारेंवर ठेवला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवतारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारेंनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना
माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवतारे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारे म्हणाले. हे सगळे संजय राऊत यांच्यामुळे घडले आहे. त्यांना सिजोफ्रेनिया आजार जडलाय. त्या आजारामुळे त्यांना वेगवेगळे भास होत असल्याचे शिवतारे म्हणाले.

शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात शिवतारे यांचा पराभव झाला होता. दरम्यान, शिवतारेंनी एकनाथ शिंदे यांची भेट त्यांना पाठिंबा दिला होता. तसेच गुरुपौर्णिमेला शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

या भेटीचा फोटोही शिवतारे यांनी पोस्ट केला होता. यातून त्यांनी शिवसेना नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवरच अखेर आता शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या