28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयप्रधानमंत्री आवास योजनेला आता २०२४ पर्यंत मुदतवाढ?

प्रधानमंत्री आवास योजनेला आता २०२४ पर्यंत मुदतवाढ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील गृहनिर्माण समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आता सरकारने प्रधानमंत्री आवास योजनाचा मुळ कालावधी वाढवत ग्रामीण भागात ही योजना मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याची तयारी दाखवली आहे. मंजूर घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सरकार ही योजना वाढवण्याच्या तयारीत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून जून २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली होती. सरकारने सुरुवातीला मार्च २०२२ ही या योजनेची अंतिम मुदत ठेवली होती. परंतु अनेक राज्यांकडून या योजनेची मुदतवाढ करण्यासाठी मागणी वाढली.

या मागणीमुळे अनेक घरांना मंजुरी मिळाल्याने बांधकाम पूर्ण होण्यास आता अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे आता या योजनेची मुदतवाढ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे.केंद्राने आतापर्यंत या योजनेंतर्गत जवळपास १.२३ कोटी घरांना मंजुरी दिली तर त्यापैकी जवळपास ९८.४ लाख घरांचे बांधकाम सुरू झाले. सरकारी आकडेवारीनुसार जवळपास ५८.७ लाख घरे या योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या