इंदापूर : जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीत पार पडले, ज्ञानोबा… माऊली… तुकाराम च्या जयघोषात रंगलेला हा ंिरगण सोहळ्या पाहण्यासाठी शहरातील व आसपासच्या तालुक्यातील लाखो विठुरायाच्या भक्तांनी हजेरी लावली होती. ंिरगण सोहळा अगदी याचि देही याची डोळा, एवढा भव्य दिव्य आणि सुंदर असा पार पडला.
यावेळी राज्याचे माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते अश्वांचे पुजन करण्यात आले.
सकाळी ११.४५ वाजता शहरातील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या संत तुकाराम महाराज पालखी प्रवेशद्वारात पालखीचे आगमन झाल्यानंतर नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, गटनेते कैलास कदम, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, शेखर पाटील, मुन्ना बागवान, बापू जामदार, माऊली वाघमोडे, विट्ठलराव ननवरे, राजेंद्र चौगुले, माऊली चौगुले यांनी सोहळ्याचे स्वागत केले.
इंदापूर मूकबधिर निवासी शाळा, नारायनदास रामदास हायस्कुलच्या विठ्ठल – रुक्मिणी व वारक-यांच्या वेशातील मुलांची दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, माजी उपनगराध्यक्ष अरंिवद वाघ, धनंजय बाब्रस, रमेश शिंदे, अनिकेत वाघ, श्री गानबोटे यांनी पालखी ंिरगण सोहळ्याच्या मध्यभागी आणून ठेवली.
यावेळी बारामती विभागाचे प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, तहसिलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामराजे कापरे, पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी व पोलीस प्रशासन, होमगार्ड, पोलीस मित्र व इंदापूर महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट असे मिळून जवळपास एक हजार पोलिसांचे रिंगण सोहळयात चोख बंदोबस्त ठेवला होता.
रिंगण सोहळ्याची सुरवात नगारखान्याच्या प्रवेशाने झाली, त्यानंतर झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, महिलांचे तुळशी व हंडा तसेच पखवाज वाले यांचे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळ्यातील लाखो वारक-यांच्या उपस्थित विठूनामाचा गजर करीत दुसरे अश्वरिंगण उत्साहात पार पडले. यावेळी तब्बल दोन वर्षांनंतर रिंगण सोहळा होत असल्याने, लाखो वारकरी वैष्णव व इंदापूरकरांनी रिंगण सोहळ्यास प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी अश्वांना रिंगणामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पालखी सोहळा अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माजी अध्यक्ष बाळासाहेब मोरे, सोहळा प्रमुख मणिक मोरे, विशाल मोरे, संतोष महाराज, विश्वस्त अजित, संजय भानुदास मोरे, बाळासाहेब मोरे, रामभाऊ मोरे, प्रल्हाद मोरे, अभिजीत मोरे आदी देहू संस्थांचे प्रमुख उपस्थितीत होते. यांनी अश्वांना चालत गोल रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केली.
त्यानंतर वारक-यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात मनोरे करून, फुगड्या खेळून आनंद साजरा केला, त्यानंतर पालखी मुक्कामासाठी नारायणदास रामदास हायस्कुलमध्ये, मुख्य बाजार पेठेतून वाजत गाजत घेवून जाण्यात आली.
यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ, माऊली चवरे, युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत सिताप, सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा, हमीद आतात यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर शहरात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पालखी विसवली व शहरातील विविध गणेश मंडळे, पतसंस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने पालखी सोबत चालत असलेल्या सर्व दिंड्यांना व वारक-यांना अन्नदानाची व मुक्कामाची उत्तम व्यवस्था केली आहे.