18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयफेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांचा राजीनामा

फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना त्यांनी आपल्याला दुसरीकडे संधी मिळाली असल्याने आपण मेटा कंपनी सोडत आहोत, असे सांगितले. गेल्या ४ वर्षांपासून त्यांनी फेसबुकमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे.

मेटाच्या ग्लोबल बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेलसोहन यांनी सांगितले की, इतर ठिकाणी कामाची संधी मिळाल्याने आपण मेटामधून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे अजित मोहन यांनी सांगितले. गेल्या ४ वर्षांपासून मोहन यांनी भारतात फेसबुकच्या ऑपरेशन्ससाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. लाखो भारतीय व्यवसाय, पार्टनर्स आणि लोकांसाठी त्यांनी काम केले आहे.

आम्ही भारतासाठी अत्यंत वचनबद्ध आहोत. तसेच आमचे सर्व कार्य आणि भागीदारी पुढे नेण्यासाठी एक मजबूत नेतृत्व संघ आम्ही निर्माण केला आहे. अजितच्या नेतृत्व आणि योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, असेही मेंडेलसोहन यांनी म्हटलं आहे.

जानेवारी २०१९ मध्ये अजित मोहन फेसबुक इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीने व्हॉटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामने भारतात २०० दशलक्ष युजर्स जोडले. मेटा कंपनीत येण्यापूर्वी मोहन यांनी ४ वर्षे स्टार इंडियाच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा हॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या