लातूर : प्रतिनिधी
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवराष्ट्र सेवा संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण दि. १४ मे रोजी कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक नियम पाळून फक्त निमंत्रिताच्यांच उपस्थितीत शासनाच्या परवानगीने लातूर येथे शिवराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संयोजक अॅड. निलेश करमुडी यांच्या निवासस्थानी विधवा पुनर्विवाह मोफत लावून दिला.
शिवराष्ट्र सेवा संघाचा हा सहावा विधवा पुनर्विवाह सोहळा होता. आजही विधवांना समाजात मानाचे स्थान दिले जात नाही़ त्यांची उपेक्षा केली जाते. आजही विधवांचा पुनर्विवाह करण्यासाठी समाजाची मानसिकता नाही़ म्हणून सर्व जाती धर्मातील विधवा, विधुर, घटस्फोटितांना परत वैवाहिक, संसारीक जीवनप्रणालीत आणून देण्यासाठी पुनर्विवाह करू इच्छिणा-यांची मोफत नोंदणी करून, त्यांचा अपेक्षेप्रमाणे वधू-वर शोधून, विवाह जमवून पुनर्विवाह लावून देण्याचे कार्य गेल्या ५ वर्षापासून शिवराष्ट्र संघाच्या वतीने सातत्याने होत आहे. या वर्षी पण विधवा पुनर्विवाह लातूर येथे करून विधवेला वैवाहिक
जीवनात आण्ून सामाजिक बदल घडवला.
Read More 24 शास्त्रज्ञांनी शोधला कोरोनाला मारण्याचा यशस्वी फॉर्म्युला
हा विधवा पुनर्विवाह सोहळा यशस्वितेसाठी शिवराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक अॅड़ निलेश करमुडी, विश्वनाथअप्पा खोबरे, संजयकुमार सुरवसे, अमृतसिंह राजपूत, महेश गायकवाड, शुभांगी तांडुरे, वर्षा मुळे, सतीश कोळपे, किरण काळे, अॅड़ अभय पाटील यांनी परिश्रम घेतले़ या सोहळ्यास वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी कैलास वर्मा, महेश
खुरसाळे प्रा. शंकरराव सोनवणे, नगरसेविका शोभा पाटील, वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते़