33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeतंत्रज्ञान‘फेसबुक’चे नाव आता ‘मेटा’

‘फेसबुक’चे नाव आता ‘मेटा’

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असे म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिऍलिटी आणि ऑगमेन्टेट रिऍलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे केलेले आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असे म्हटले जाते.

स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईलपर्यंत येऊन पोहचलो. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसे आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही ‘मेटा’ या नावाने ओळखले जाणार आहोत, असे मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणा-या फेसबुकने आपले नाव बदलले आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे.

कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामे करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचे म्हणजेच पॅरेंट कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचे झुकरबर्ग म्हणाला आहे. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितले आहे. फेसबुकचे नवे नाव मेटा असे असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या