25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeयाकूबच्या चुलतभावासोबत फडणवीस आणि राज्यपालही ; फोटो शेअर करत शिवसेना-काँग्रेसकडून भाजपवर हल्लाबोल

याकूबच्या चुलतभावासोबत फडणवीस आणि राज्यपालही ; फोटो शेअर करत शिवसेना-काँग्रेसकडून भाजपवर हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाची धमकी देणा-या रऊफ मेमनसोबतच्या बैठकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या किशोरी पेडणेकरांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. आरोप करणा-या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्विट केला आहे.

मुंबईतील बडा कब्रस्तान येथे याकूब मेमनची कबर आहे. या कबरीची सजावट केल्याचे समोर आले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किशोरी पेडणेकर आणि रऊफ मेमनसोबतच्या बैठकीतला व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी किशोरी पेडणेकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. महाविकास आघाडीचे नेते आणि टायगर मेमन, दाऊदच्या संबंधाच्या चौकशीची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्विट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुस-यावर आरोप करणा-यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्विट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा फोटो शेअर करत सावंत यांनी रऊफ मेमन ते हेच का? असा प्रश्न केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या