मुंबई : राज्यात गेल्या सात दिवसांपासून सत्ता नाट्य रंगले आहे. राजकीय संकट सातत्याने धक्कादायक आणि लक्षवेधी वळणे घेत आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५१ आमदारांनी सरकारविरोधात भूमिका घेतल्याने राज्यातील मविआ सरकार धोक्यात आले आहे. बहुमत चाचणी उद्या घेण्यात येणार आहे.
यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला असून मॅजिक फिगर गाठण्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. विरोधीपक्ष नेते देंवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी बहुमत चाचणीत एकेक मत महत्त्वाचे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. उद्या घेण्यात येणा-या बहुमत चाचणीपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधत समर्थन मागितले आहे. विधानसभेत मनसेचा एक आमदार आहे.