33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeमहाराष्ट्रफडणवीसांची ठाकरेंवर टीका; पृथ्वीराज चव्हाणांनी केले लाईक

फडणवीसांची ठाकरेंवर टीका; पृथ्वीराज चव्हाणांनी केले लाईक

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्यांचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजेच ५ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

‘उद्धव ठाकरे , कोण होतास तू , काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू ’अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती.
दरम्यान, सत्ताधारांच्या विरोधात असणा-या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेता चव्हाण यांनी कंबोज यांच्या या ट्विटला लाईक केले आहे.

महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्यांचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, भाजप नेते मोहित कंबोज यांनी पोस्ट केलेल्या फडणवीसांच्या व्हीडिओला लाईक केले. या बातमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टीकरण दिले आहे. चव्हाण यावर बोलताना म्हणाले कि, ‘नक्की काय झालंय ते मी तपासून बघतोय. इतक्या वर्षात मी कधीही असं काही केले नाही, मला जर असे करायचे असते तर मी खुल्या मंचावरुन केले असते, माझी भूमिका मांडण्यासाठी मी एखाद्या ट्विटला लाईक का करेन’, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या