मुंबई : ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात, तेव्हा त्याचे आत्म परीक्षण करण्याची गरज होती. आपण तर नगरविकास मंत्री होतो, पण आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या समस्या होत्या. त्यासाठी प्रयत्न करुनही उत्तर मिळाले नाही, म्हणून निर्णय घ्यावा लागला. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्म करण्यासाठी निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांनी जो निर्णय घेतला.
त्यांच्याकडे १२० आमदार त्यांच्याकडे आहे. खरेतर मुख्यमंत्रीपद ते घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिली. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांचे आभार मानतो. पदासाठी हे केलेले नाही. ही ऐतिहासिक घटना आहे. राज्याच्या विकासाला पुढे घेऊन जाऊ. मंत्रिमंडळात नसले तरी ते आमच्यासोबत आहेत. असा मोठेपणा दिसत नाही.