23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंना भेटायला फडणवीस वेशांतर करून जात होते; अमृता फडणवीसांची कबुली

शिंदेंना भेटायला फडणवीस वेशांतर करून जात होते; अमृता फडणवीसांची कबुली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात भूकंप घडवणारे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रोखठोक भाषण करून सर्वांची मनं जिंकली. यावेळी सत्तासंघर्ष सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांना रात्री गुपचूप भेटायला जात होतो, असा खुलासाच केला. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यास दुजोरा दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार अशी दाट शक्यता होती आणि तशी चर्चाही रंगली होती. पण, अचानक फडणवीस यांनीच पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. पण, अमृता फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री सगळे आमदार झोपल्यानंतर फडणवीस यांची भेट घेत होतो, अशी कबुली दिली होती. त्यांच्या वक्तव्याला अमृता फडणवीस यांनीही दुजोरा दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे रात्री वेश बदलून शिंदे यांना भेटायला जात होते. हुडी आणि गॉगल घालून ते भेटायला जात होते. त्यांचे हे वेशांतर पाहून मीही त्यांना ओळखत नव्हते, असा खुलासाच अमृता फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाहीत हे मला आधीच माहीत होते. ते कोणतेही पद स्वीकारणार नव्हते. त्यांच्या या निर्णयाचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनी दाखवून दिले की, पदापेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचे आणि मोठे आहे. त्यांनी मोठ्या मनाने, हसतमुखाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या