16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रप्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तबस्सुम या ७८ वर्षांच्या होत्या. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. रामायण या प्रसिद्ध मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांच्या या वहिनी होत्या.

तबस्सुम गोविल यांना शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आज मुंबईत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा होशांग गोविल याने आईचा अंत्यविधी होईपर्यंत आईच्या मृत्यूची माहिती कोणाला दिली नव्हती.

तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाला सुरुवात केली होती. १९४७ मध्ये आलेल्या मेरा सुहाग या सिनेमात त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अनेक टेलिव्हिजन शो, मालिकांमध्ये काम केले. दूरदर्शनचा देशातील पहिला टॉक शो फूल खिले हैं गुलशन गुलशन तबस्सुम यांनी होस्ट केला होता. १९७२ ते १९९३ पर्यंत त्या या शोच्या होस्ट म्हणून काम करत होत्या. या कार्यक्रमात त्यांना बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली होती. तसेच तबस्सुम गोविल या युट्यूबरही होत्या. फिल्म इंडस्ट्रीतील अनसुने किल्ले त्या व्हिडीओकरून सांगत असत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या