26.3 C
Latur
Sunday, March 26, 2023
Homeमनोरंजनप्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन

प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : संगीत जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी वाणी या मृतावस्थेत आढळून आल्याचे थाउझंड लाईट्स पोलिस अधिका-यांनी सांगितले. याबाबत अधिकचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

वाणी जयराम यांचे निधन नक्की कशामुळे झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

वाणी जयराम यांनी नुकतीच व्यावसायिक गायिका म्हणून संगीत क्षेत्रात ५० वर्षे पूर्ण केली होती. वाणी यांनी त्यांच्या कारकीर्दीत १०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. वाणी जयराम यांनी आर. डी. बर्मन, के. व्ही. महादेवन, ओ. पी. नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह अनेक प्रसिद्ध संगीतकारांसोबतही काम केले होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या