गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून आज (बुधवार) सकाळी पेरणीसाठी शेतात गेलेल्या आणखी एका शेतक-याचा वाघाने बळी घेतला आहे.
सागर आबाजी वाघरे (४८), असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील बोरीचक गावातील सागर वाघरे आज सकाळी शेतात पेरणीसाठी गेले होते. दरम्यान, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.