24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यातील संपावर असलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

हिंगोली जिल्ह्यातील संपावर असलेले शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

एकमत ऑनलाईन

हिंगोली : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्याला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता.

त्यावेळी शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने नुकसानग्रस्त भागातील शेतक-यांना मदत देण्याचे जाहीर केले. पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. आज संपावर असलेले शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी १३ हजार ५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु या मदतीपासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वंचित रहावे लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या भागातील जवळपास ४० ते ४५ गावांतील शेतक-यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.

त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून गोरेगाव येथील सर्व शेतकरी संपावर गेले आहेत. राज्य शासनाने अद्यापही या संपाची दखल घेतली नाही. त्यामुळे गोरेगावमधील शेतकरी आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज शेतक-यांनी रस्त्यावर दूध फेकत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. सेनगाव तालुक्यातील मदतीपासून वंचित असलेल्या या गावांचा तत्काळ नुकसानग्रस्त असलेल्या गावांच्या यादीत समावेश करावा. तसेच तत्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी शेतक-यांनी केली आहे.

दरम्यान, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडला आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके वाया गेली आहेत. तसेच अनेक शेतक-यांच्या शेतजमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर असणार आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या