16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeबीडचिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख करत शेतक-याची आत्महत्या

चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख करत शेतक-याची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

बीड : शेतकरी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ, अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड येथील शेतक-याने जीवन संपवत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करत आत्महत्या केली आहे.. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान शेतक-याने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहिली आहे. ज्यामध्ये आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, की मी माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही. खर्च करूनही मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नाही. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. अशी चिठ्ठी लिहून बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावच्या शेतक-याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे

दादा डिसले असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही आणि त्यावर बेरोजगारी अशा कारणांनी बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावचे शेतकरी दादा डिसले यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट समोर आली आहे. त्यात दादा डिसले यांनी मराठा आरक्षण नसल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या