36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयलाल किल्लयावर शेतकऱ्यांचा हिंसाचार

लाल किल्लयावर शेतकऱ्यांचा हिंसाचार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये मंगळवारी एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना दुसरीकडे नव्या कृषि कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाºया शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. या हिंसाचारात दिल्ली पोलिसचे ३०० पेक्षा अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर रॅलीच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतक-यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर विरोध करणा-या पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या. या सर्व घडामोडींमुळे दिल्लीत कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

दिल्लीत प्रवेश केल्यानंतर शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी तिथे उपस्थित पोलिस कर्मचा-यांवर शेतक-यांनी काठ्यांनी हल्ला केला. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओत जवळपास डझनहून अधिक पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान संतप्त शेतक-यांच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवण्यासाठी लाल किल्ल्याच्या इमारतीवरुन उड्या मारताना दिसत आहे. जवळपास १५ फुटांच्या भिंतीवरून उडी मारण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्यात नव्हता. व्हिडीओत शेतकरी पोलिसांना काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. शेतकरी आतमध्ये घुसताच पोलिसांना तेथील कठड्यावर चढून आणि नंतर भिंतीवरुन उडी मारताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी काही पोलिस कर्मचारी मात्र शेतक-यांसोबत संघर्ष करत होते.

लाल किल्ला अपवित्र केला : भाजप
भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले, जी शंका होती, ते खरे ठरले. शेतकरी संघटना मोठ-मोठ्या गप्पा मारत होत्या, की शिस्त राखली जाईल. आम्ही आनंदोत्सवात सहभागी होत आहोत. हा आनंदोत्सव होता, की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतावर हल्ला होता? यांनी लाल किल्ला अपवित्र केला आहे. यासंर्वांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी. एवढेच नाही, तर भडकावण्याचे काम तर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले. शेतकरी संघटनेचे नेते केवळ भडकावण्याचेच काम करत होते आणि आता घटना घडून गेल्यानंतर ते आपले ज्ञान पाझळत आहेत, असेही शाहनवाज हुसैन म्हणाले.

दुर्योधनाचा अहंकार नडला : काँग्रेस
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी महाभारताचा उल्लेख करत म्हणाले आहे, महात्मा विदूर यांच्या सारखे मंत्री, कृपाचार्यांसारखे राजगुरू, द्रोणाचार्यांसारखे महारथी आणि भीष्मांसारखे मार्गदर्शक असतानाही हस्तिनापूरचा सर्वनाश कसा झाला? कारण दुर्योधनाच्या अहंकारापुढे सर्व मौन राहिले आणि या मौनाची किंमत सर्वांनाच चुकवावी लागली. वाटले, आठवन करून द्यावी.

सरकारने हिंसाचाराला गांभीर्याने घ्या : मायावती
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या, देशाच्या राजधानीत काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकºयांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जे काही घडले, ते कदापी व्हायला नको होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रातील सरकारनेही हे गांभीर्याने घ्यायला हवे. याच बरोबर, बसपा केंद्र सरकारला पुन्हा विनंती करते, की त्यांनी हे तीनही कृषि कायदे विलंब न करता परत घ्यावेत आणि शेतकºयांचे आंदोलन संपवावे, जेनेकरून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये.

पोलिसांनी २२ एफआयआर नोंदविल्या
राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनप्रसंगी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलिस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर पोलिसांनी २२ एफआयआर नोंदवल्या आहेत. हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास क्राइम ब्रांच, स्पेशल सेलकडे सोपविण्यात आला आहे.

फारच दुर्दैवी घटना : अण्णा हजारे
दिल्लीत मंगळावारी घडलेल्या हिंसाचाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अण्णा हजारे या घटनेबाबत म्हणाले की, दिल्लीत जे घडले ते नक्कीच क्लेशदायक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

संसद मार्च रद्द करणार?
दिल्लीत शेतक-यांच्या ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांकडूनही आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद भवनाला घेराव घालणार असल्याची घोषणा केली होती. पण सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून संसद मार्च रद्द केला जाण्याची शक्यता आहे.

गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
दिल्लीत काल झालेल्या हिंसाचारात सरकारी मालमत्तेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ३०० दिल्ली पोलिस जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेबाबत शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक आता दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. कालच्या घटनेवर केंद्र सरकारही मोठी कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही तासांत शेतकरी आंदोलनाबाबत मोठ्या घडामोडी राजधानी दिल्लीत घडताना दिसतील.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
दिल्ली हिंसाचारप्रकरणी मोठी बातमी हाती येत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच ३ निवृत्त न्यायाधिशांच्या समितीमार्फत याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांचे शांततेचे आवाहन
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांचा विनम्रतेने तुम्ही जग हलवू शकता, हा सुविचार सांगितला आहे. तसेच, पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन आहे की, तत्काळ कृषि विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत. असे देखील राहुल गांधींनी ट्वटिद्वारे म्हटले आहे. या अगोदर काल दिल्लीत हिंसाचार घडत असताना देखील राहुल गांधी यांनी ट्विट करत, शेतकºयांना शांततेचे आवाहन केले होते.

मुंडेसाहेबांची अपूर्ण लढाई लढणार; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा एल्गार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या