मुंबई : महिन्याभरापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची वीजबिले थकल्याने थकबाकीचे ओझे वाढले. त्यामुळे महावितरणने जिल्ह्यातील विविध ग्रा.पं.हद्दीतील पथदिव्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली होती. या पार्श्वभूमिवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिवसा वीज कशी देता येईल याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
२०१८ मध्ये एक मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना सुरु केली होती. ज्यामध्ये जे काही अॅग्रीकल्चर फिडर आहेत. त्याठिकाणि दिवसा आपल्याला वीज देता येईल. त्याकाळात आपण २०० मेगा व्हॅटच काम आपण पुर्ण केलं आणि काही काम प्रगती पथावर होत. पण नंतरच्या काळामध्ये त्याला ब्रेक बसला होता. आज पुन्हा एकदा ही योजना आम्ही फॅस्ट्रॅकवर आणली आहे. असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या वर्षी म्हणजे एका वर्षात किमान ३० टक्के अॅग्रिकल्चर फीडर हे सौरऊर्जेवर कसे आणता येईल जेणेकरुन शेतक-यांना दिवसा वीज कशी देता येईल याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती दिली. आणि त्याचा संपूर्ण आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मान्यताकरता पाठवत आहोत असेदेखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महावितरणची थकबाकी भरावी लागणार
यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या योजना किंवा पथदिवे बिल न भरल्यामुळे बंद आहे आणि या बिलांवर व्याज चक्रवाढ असे वाढत महावितरणाची थकबाकी दिसते. म्हणून यासंर्भात जूनी सगळी थकाबाकी वन टाईम सेटलमेंट सारखी महावितरण आणि राज्यसरकारने त्याचा निर्णय करावा आणि मग राज्यसरकारने ती थकबाकी भरावी आणि प्रामणिकपणे राज्य सरकार जी मदत करेल त्या मदतीतून गावच्या सरपंच्यांनी ते बिल भरावे असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
६ महिन्यांत शेतक-यांना सोलर पंप
६ महिन्यात शेतक-यांना सोलर पंप देणार. सोलर पंप देण्याबाबतचा आरखडा करण्यात आला आहे अशी माहितीदेखील फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.