27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडनांदेडमध्ये भीषण अपघात; तिघांनी गमावला जीव, सात जखमी

नांदेडमध्ये भीषण अपघात; तिघांनी गमावला जीव, सात जखमी

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील राजवाडी गावाजवळ आठवडी बाजारासाठी हिमायतनगरकडे जाणारा टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला व अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात ३ ठार तर सात जण जखमी झाले असून, जखमींना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयतांना शासकीय रुग्णालयात उत्तरतपासणीसाठी हलवण्यात आले आहे.

अपघातात मयत झालेल्यांमध्ये म. हाफीज म. हुसेन, म रफीक म. आमिनसाब, म. चांद म. मिरासाब यांचा समावेश आहे. तर जखमींवर मुदखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान किरकोळ भाजीपाला व्यावसायिक असणारे हे सर्वजण आज हिमायतनगर येथील आठवडी बाजारासाठी जात होते. मयत व जखमी सर्व आठवडी बाजाराचे किरकोळ व्यापारी होते. हिमायतनगरच्या बाजारासाठी जात असताना खड्ड्यांमुळे राजवाडी तांड्याजवळ हा अपघात झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या