28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रदापोलीत दोन एसटी बसचा भीषण अपघात; चालक गंभीर

दापोलीत दोन एसटी बसचा भीषण अपघात; चालक गंभीर

एकमत ऑनलाईन

दापोली – रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एसटीच्या दोन बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एका बसचा चालक गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, इतर जखमींमध्ये २५ जणांचा समावेश असून, महिला आणि विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

दरम्यान, जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसून, या बस नेमक्या कुठे निघाल्या होत्या याबद्दल काही समजू शकलेले नाही. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या