32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमहाराष्ट्रपरराज्यातून येणा-या नागरिकांमुळे ग्रामस्थांमध्ये भिती

परराज्यातून येणा-या नागरिकांमुळे ग्रामस्थांमध्ये भिती

एकमत ऑनलाईन

अहमदपुर : कोवीड १९ या विषाणूच्या भितीने राज्य व गाव सोडून गेलेले नागरिक शिरुर ताजबंद, महादेववाडी धाकटीवाडी, थोरलीवाडी भवानवाडी व परिसरातील गावात गुजरात कर्नाटक,आंध्रप्रदेश , मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक अशा गावाहून नागरिक गावी येत असल्याने ग्रामस्थांतात भितीचे वातावरण पसरले आहे़ त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी घरातच थांबावे १४ दिवस कोणाचाही संपर्क येवू देवू नये अशा प्रकारच्या सुचना वैद्यकिय अधिकारी डॉ.मारोती पाटील व ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सदस्य विक्रम भोसले यांनी महादेववाडी येथे जाऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांंना दिल्या.

गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, या राज्यासह नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरातून सरकारने गावाकडे जाण्यासाठी परवानगी दिल्याने दररोज ग्रामिण भागात नागरिक येत आहेत. त्यामुळे शहरात कोरोना आजार फैलावत आहे. आपले गाव सुरक्षित असताना बाहेर गावाहून आलेले हे व्यक्ती आजार घेवून तर आले नाहीत ना अशी भिती ग्रामस्थामध्ये पसरलेली आहे.

Read More  मागेल त्याला काम, काळजी करू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या तालुक्यात बाहेरगावाहून गावात आलेल्या नागरिकांना सध्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नसली तरी १४ दिवस होम क्वारंन्टाइन (घरातच थांबण्याचा) सल्ला वैद्यकिय अधिकारी ,ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थाकडून विचारपूस करून स्वत:च्या घरी थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावेळी डॉ. मारोती पाटील, ग्रा.पं.सदस्य विक्रम भोसले, ग्रा.प.सदस्य गजेंद्र वलसे, बालाजी जवळगे , आशा कार्यकर्ती जयश्री बुरुसपट्टे, आरोग्य सहाय्यक एम.एम.शिंदे, माधुव देवदे, मुख्याध्यापक संजय बडगीरे, शिक्षक धोंडीराम माळी, मारुती मोरे, अंतेश्वर वलसे, तलाठी नवनित जामनिक, पो.कॉ.गजानन पुल्लेवाड, सचिन पेद्देवाड, बाबुराव चामे,करकनाळे, बाबूराव येलमटे, मनोज चामे, हानमंत बडगिरे,विठ्ठल गुंडरे.आदिजन उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या