26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeआंतरराष्ट्रीय९८ प्रवासी दगावल्याची भीती : पाकिस्तानात कराची विमानतळाजवळ प्रवासी विमान कोसळून अपघात!

९८ प्रवासी दगावल्याची भीती : पाकिस्तानात कराची विमानतळाजवळ प्रवासी विमान कोसळून अपघात!

एकमत ऑनलाईन

विमानात एकूण 107 लोक : विमानतळाजवळील निवासी भागात  क्रॅश : 15 ते 20 लोकांना बाहेर काढण्यात यश 

नवी दिल्ली : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एक प्रवासी विमानाला शुक्रवारी जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराची येथे जात होतं. विमान अपघातात 98 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. लँडिंग होण्यापूर्वीच विमानाला कराची विमानतळाजवळ अपघात झाला. विमान मॉडेल टाऊन या निवासी भागात कोसळल्याने मोठी खळबळ माजली. या निवासी भागातील अनेक घरांना आग लागली आहे. या दुर्घटनेत 7 घरं पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. पैकी 99 प्रवासी आणि क्रूचे आठ सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 ते 20 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. हे विमान सुमारे दहा वर्ष जुने आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विमान अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की पीआयएच्या दुर्घटनेची घटना धक्कादायक आणि खेदजनक आहे. मी पीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरशद मलिक यांच्या संपर्कात आहे. अर्शद मलिक कराचीला रवाना झाले आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास हे विमान लाहोरहून कराचीला निघाले होते. कराची विमानतळाजवळील निवासी भागात ते क्रॅश झाले. रहिवासी क्षेत्र असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More  अक्षयकुमारला मोठा फटका : ‘लक्ष्मी बॉम्ब’ रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत

अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचा लोट दिसून येत आहे. बचाव अधिकारी जखमींना जवळच्याच रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विमान अपघातामुळे कराचीतील सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पाकिस्तान लष्कराच्या मीडिया विंग इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनने (आयएसपीआर) ट्विट केले आहे की, पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर मदतीसाठी पोहचले आहेत. सैन्यदलाची क्विक अॅक्शन टीम आणि पाकिस्तानी सैनिक नागरिकांच्या मदत व बचावासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे विमान जीना गार्डनजवळ कोसळले. या स्फोटाचा आवाज दूरवरून ऐकू आला.

विमानात 100 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघातानंतर चारही बाजूंनी दूरपर्यंत धूराचे लोळ पसरले आहेत. अनेक गाड्यांना आग लागली आहे. या अपघातामुळे जिवित आणि वित्त हानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घरांमधून अनेक रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. कराची येथील रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या